शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांच्या नव्या इनिंगला आता बळ ; ब्लॅकमेलिंगचे राजकारण नियंत्रित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 14:45 IST

संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन  गेल्या मार्च महिन्यात मनोहर पर्रीकर गोव्याच्या राजकारणात परतले व त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन  गेल्या मार्च महिन्यात मनोहर पर्रीकर गोव्याच्या राजकारणात परतले व त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. विधानसभा पोटनिवडणुकीतील सोमवारच्या घवघवीत यशामुळे आता पर्रीकर यांच्या गोव्यातील नव्या इनिंगला नवे बळ प्राप्त झाले आहे.

सदगुरू पाटील

पणजी, दि. 28 - संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन  गेल्या मार्च महिन्यात मनोहर पर्रीकर गोव्याच्या राजकारणात परतले व त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली तरी, त्यांना सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांच्याच कलाने राज्य कारभार चालवावा लागला. विधानसभा पोटनिवडणुकीतील सोमवारच्या घवघवीत यशामुळे आता पर्रीकर यांच्या गोव्यातील नव्या इनिंगला नवे बळ प्राप्त झाले आहे. घटक पक्षांचे ब्लॅकमेलिंगचे राजकारणही यामुळे आता नियंत्रित होऊ शकेल असे मानले जात आहे.जिल्हा पंचायतीच्याही पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारीच लागला. जिल्हा पंचायतींच्या चारपैकी दोन जागा भाजप जिंकला व विधानसभेच्या दोन्ही जागा आम्हीच जिंकलो. आपल्या सरकारच्या कारभारावर गोमंतकीयांनी मोहर उमटवली, असे मुख्यमंत्री निकालानंतर म्हणाले. 

पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीत गोवा फॉरवर्डचे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आणि अपक्ष  तीन असे एकूण नऊ बिगरभाजप आमदार आहेत. या शिवाय आता भारतीय जनता पक्षाचे स्वत:चे संख्याबळ 14 झाले आहे. यामुळे सरकार पूर्ण स्थिर झाले आहे. गोवा विधानसभा ही एकूण 40 सदस्यांची आहे व अशा विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदार पुरेसे असतात. पर्रीकर यांच्याकडे एकूण 23 आमदारांचे संख्याबळ आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की 21 ते 23 संख्या ही कोणत्याही सरकारसाठी सुरक्षित असते. त्यामुळे आता आम्हाला काँग्रेसच्या आमदारांची गरज नाही.

पर्रीकर यांनी गेले काही महिने आघाडीच्या घटक पक्षांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. सरकार टीकविण्यासाठी प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांना दुखवून मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षाच्या काही मंत्री व आमदारांचे समाधान केले. पर्रीकर स्वत: गोवा विधानसभेचे सदस्य नव्हते. तसेच भाजपचे संख्याबळ फक्त 12 होते. यामुळे  घटक पक्षांच्याच कलाने पर्रीकर याना नेहमी पाऊले उचलावी लागली. सोमवारी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला व पर्रीकर विधानसभा सदस्य बनले. सरकारमध्ये व विशेषत: भाजपमध्ये आता नवा उत्साह संचारला आहे.

पर्रीकर यांचा स्वभाव हा मानी आहे. ते सहसा नमते घेत नाहीत पण गेले काही महिने प्राप्त परिस्थितीत त्यांना घटक पक्षांचे ब्लॅकमेलिंगचे राजकारण निमुटपणे सहन करावे लागले, अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. पर्रीकर यांची मुख्यमंत्री म्हणून  नवी आणि चौथी इनिंग आता सुरू असून नव्या यशामुळे या इनिंगला आता आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. याउलट विरोधी काँग्रेस पक्षाचे मनोबल फार कमी झाले आहे.